HOME|DOWNLOAD|CONTACT US|English
Sanskruti Kala Darpan
skd about skd Winners of  2011 Past Awards Gallery Press / Media skd

 Home  >  About SKD

संस्कृती कला दर्पण.

सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात नाविन्यात्मक कलात्मक दर्जेदार निर्मितीसाठी जन्म घेतलेली आपली "संस्कृती कला दर्पण" ही संस्था आहे. समाज, साहित्य, रंगभूमी व चित्रपट संपूर्ण सांस्कृतीक चळवळ वाहून घेण्याचे उद्दिष्ट संस्कृती कला दर्पणने अंगिकारले आहे.

आपली कला नाटक, सिनेमा, एकांकिका, कविता, कथा, चित्र, शिल्प, लेखन, कादंबरी अशा माध्यमातून कलाकार समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो, पण मांडण्यासाठी सुद्धा व्यासपीठाची उपलब्धता असावी लागते. तेच व्यासपीठ आम्ही निर्माण करुन देत असतो. भरत मुनींच्या नाटय शास्त्रापासून सुरु झालेला नाटयप्रवास आजपर्यंत आपल्या परीने समृद्ध होत आहे. नाटकाचा हा प्रवास किर्तन, भारुड, दशावतारांपासून सुरु झालेल्या लोक रंगभूमीची जागा कालांतराने संगीत रंगभूमीने घेतली आणि हळुहळु संगीत रंगभूमी आजच्या नवनटयाजवळ येऊन उभी आहे. आम्ही भारतीय संस्कृतीला अनुसरुन सांस्कृतीक कार्यक्रमाची आखणी करुन विविध स्पर्धांचे आयोजन करतो. विद्यार्थ्यांच्या तसेच कलावंताच्या कलेसाठी एक खुले व्यासपीठ उपलब्ध करुन  देऊन त्यांचा या क्षेत्रातील पाया भक्कम करुन यातून एखादा चित्रकार शिल्पकार नाटय, चित्रपट सृष्टीतील उगवता कलाकार तयार होऊ शकेल हाच निर्मळ मुख्य हेतू होय.

गुरुवर्य कै. अरविंद वैद्य यांना स्मरून आम्ही गुरुवर्य कै. अरविंद वैद्य स्मृती, आंतरशालेय चौफेर विविध कलागुण स्पर्धा सप्टेंबर व ऑक्टोबर २००८ मध्ये आयोजित केल्या होत्या. वक्तृत्व, नाट्यप्रवेश, लावणी, चित्रकला, नृत्य, हस्ताक्षर, गीतगायन, विविध वेशभूषा, रेकॉर्ड डान्स स्पर्धेत ठाणे व मुंबई विभागातून ८० शाळांकडून  एकूण ४००० विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ न प्रचंड प्रतिसाद दिला. शिक्षकांकडून तसेच जागृत पालकांकडून मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल आम्ही या सर्वांचेच आभारी आहोत.

ना नफा ना तोटा या तत्त्वावर आमच्या संस्थेचे काम चालू आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्यानेच या संपूर्ण कार्याचा गाडा हाकत आहोत. यंदाचे हे दहावे वर्ष भव्यपणे साजरे होणार आहे. काही टिव्ही चॅनेल्स आणि रिऍलिटी शोजला मिळाणार्‍या प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे आम्ही सुद्धा या सोहळ्यात प्रेक्षकांना सहभागी करत आहोत.

याकरता आपल्या साईटवरील एन्ट्री फॉर्म व प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया नोंदवण्याची सुविधा आपण उपलब्ध करुन दिली आहे. तुमच्या सूचना आणि सहकार्य आम्हाला आणखी परिपूर्ण बनवतील.
तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे.


आपले नम्र,
चंद्रशेखर व्यं. सांडवे
अध्यक्ष
संस्कृती कला दर्पण.